सोशल मीडिया वापरताना या 5 चुका करु नका!

आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबतात. अनेकदा कशाचाही विचार न करता यूजर्स आपलं लोकेशन शेअऱ करतात. त्यामुळे तुमच्या खाजगी माहितीचा खुलासा होत असतो. 

सुरुवातीला कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगसाठी सुरु झालेलं प्लॅटफॉर्म आता लोकांसाठी लाइफलाइन ठरत आहे. होय, आपण सोशल मीडियाबाबत बोलतोय. सोशल मीडिया लोकांशी संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. पण काहीवेळा लोक लोकप्रिय होण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी आणि लोकांचं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबतात. अनेकदा कशाचाही विचार न करता यूजर्स आपलं लोकेशन शेअऱ करतात. त्यामुळे तुमच्या खाजगी माहितीचा खुलासा होत असतो.



सोशल मीडियात या सवयी टाळा
ग्लोबल 2017 नॉर्टन सायबर सिक्युरिटी इनसाईट्सच्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी 20 देशांमध्ये हॅकर्सनी साधारण 978 मिलियन डॉलर्स यूजर्सना 172 मिलियन डॉलरने फसवले. 30 जून ला ‘Social Media Day’ साजरा केला जातो. ट्विटर, स्नॅपचॅट, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तुम्ही जर हा दिवस साजरा करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 
सर्वकाही पब्लिक पोस्ट नका करू
प्रत्येक गोष्ट पब्लिक करू नका. सर्वच सोशल मीडिया साईट्सवर तुमची पोस्ट लिमिटेड लोकांपर्यंत ठेवण्यासाठी पर्याय मिळतो.  सर्वच सेटिंगचा उपयोग करुन बघा त्यातील तुम्हाला जी योग्य वाटेल ती ठेवा. ही सुविधा असली तरी तुम्ही पूर्णपणे सुरक्षित नाही आहात. त्यामुळे ज्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या सोशल मीडियात शेअर करू नका
.कुणालाही फ्रेन्ड करू नका
काही वर्षांपर्यंत सोशल मीडिया यूजर्समध्ये सर्वात जास्त कनेक्शन बनवण्याची शर्यत लागली होती. पण आता यूजर्स हुशार झाले आहेत. त्यामुळे अशाच लोकांना फ्रेन्डलिस्टमध्ये अॅड करा ज्यांना तुम्ही पर्सनल लाइफमध्येही ओळखता. काही अडचण आल्यास ब्लॉक फिटरचा वापर करा. 
खूप जास्त पर्सनल होऊ नका
सोशल मीडिया प्रत्येकवेळी हॅकर्सच्या निशान्यावर असतं आणि ते येथून तुमची जन्मतारीख, शिक्षण, इंट्रेस्ट ही सगळी माहिती गोळा करतात. आणि त्याचा गैरवापर करतात. तुमचं प्राफाईल जास्त प्रायव्हेट ठेवा आणि काही शेअर करण्यापूर्वी दोनदा विचार करा. 
आपल्या कम्प्युटरवर नेहमी लॉग-ऑन राहू नका
जर तुम्ही पब्लिक कम्प्युटरचा वापर करत असाल तर लॉगआउट करण्याची सवय करुन घ्या. त्यासोबतच प्रायव्हेट डिव्हायसेसवर सुद्धा लॉगआउट करत रहा. लॉगआउट करत राहिल्याने हे कुणीही त्यात डोकावत नाहीये हे कळेल. त्यासोबतच लॉगआउट केल्याने कुणीही तुमची माहिती चोरी करु शकणार नाही.

सर्वच सोशल मीडिया अकाऊंटसाठी सारखा पासवर्ड नको
ज्या पासवर्डचा वापर तुम्ही ट्विटरसाठी करत आहात तोच पासवर्ड तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा दुसऱ्या सोशल मीडिया साईट्ससाठी करु नये. हे जरा कठीण काम होईल पण सिंगल पासवर्डचा वापर केल्या हॅकर्सना तो क्रॅक करण्यास सोपं होतं. हॅकर्सला जर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड कळाला तर ते तुमचं अकाऊंट हॅक करु शकतात. 



Comments

Popular posts from this blog

आता मोबाईल पडल्या वरही मोबाईल स्क्रीन तुटणार नाही !

अब 10 नहीं बल्कि इतने अंकों का होगा आपका मोबाइल नंबर, जानेें क्या है वज़ह

नेटवर्क नसलं तरी चिंता नाही, वायफायने कॉल करता येणार!