नेटवर्क नसलं तरी चिंता नाही, वायफायने कॉल करता येणार!

आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.




मुंबई  : मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.

‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.

कसा असेल वायफाय कॉल?

ग्राहकांना इंटरनेट टेलीफोनीसाठीच्या वापरासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप ग्राहकांना त्यांची टेलीकॉम कंपनीच उपलब्ध करून देईल. त्यामुळे तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिमकार्ड असेल त्याच कंपनीचा टेलीफोनी मिळेल.

सिमकार्डबरोबर लिंक असणारा नंबरच तुम्ही वापरु शकाल. ग्राहक दुसऱ्या कंपनीचेही टेलीफोनी अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसारखाच एक दहा अंकी नंबऱ मिळेल, ज्याचा कॉल करण्यासाठी तुम्ही वापर करु शकाल.


ट्रायची शिफारस 

खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ही शिफारस केली होती.

Comments

Popular posts from this blog

आता मोबाईल पडल्या वरही मोबाईल स्क्रीन तुटणार नाही !

अब 10 नहीं बल्कि इतने अंकों का होगा आपका मोबाइल नंबर, जानेें क्या है वज़ह