आता पीसीओप्रमाणे वायफायची सुविधा; देशभर मिळणार इंटरनेट

भारतात लवकरच वाय-फाय कनेक्शन शेअर करुन पैसे कमावण्याची सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग सार्वजनिक डेटा ऑफिसच्या व्यावसायिक वापराला मंजुरी देण्याची चिन्हे आहेत.


नवी दिल्ली : भारतात लवकरच वाय-फाय कनेक्शन शेअर करुन पैसे कमावण्याची सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे. दूरसंचार विभाग सार्वजनिक डेटा ऑफिसच्या व्यावसायिक वापराला मंजुरी देण्याची चिन्हे आहेत. मात्र डेटा ऑफिस सुरु करण्यासाठी गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांनाही सूट देण्यात येणार आहे, मात्र याला टेलिकॉम कंपन्यांचा विरोध आहे.

सार्वजनिक डेटा ऑफिस कोणीही सुरु शकतात. त्यामुळे येत्या काळात अशी वाय-फाय पुरवणारी सार्वजनिक डेटा ऑफिस पीसीओप्रमाणे सर्वत्र दिसतील. या ऑफिसमधून २ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंतचे कुपन घेऊन अर्धा तास ते पूर्ण दिवस वाय-फायचा वापर करता येणार आहे. पेमेंटसाठी पेटीएम आणि भीम अॅप यांसारख्या डिजिटल अॅपचा वापर केला जाऊ शकतो.

सरकारने व्यावसायिक रुपात असे 415 डेटा ऑफिस प्रयोग म्हणून सुरू केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दूरसंचार विभागाने ट्रायचे सल्ले मान्य केले आणि आता लवकरत याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिकररित्या वाय-फाय सेवा पुरवण्यासाठी डेटा ऑफिस सुरु झाल्याने देशात मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

मात्र फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्याही ग्राहकांनी ही सेवा देऊ शकतात, हीच बाब टेलिकॉम कंपन्यांना मान्य नाही. फेसबुक, गुगल सारख्या कंपन्यांनी ही सेवा दिली तर नेट न्युट्रलिटीच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकतं, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे

Comments

Popular posts from this blog

आता मोबाईल पडल्या वरही मोबाईल स्क्रीन तुटणार नाही !

अब 10 नहीं बल्कि इतने अंकों का होगा आपका मोबाइल नंबर, जानेें क्या है वज़ह

नेटवर्क नसलं तरी चिंता नाही, वायफायने कॉल करता येणार!